भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नैसर्गिक बंदरांमुळे समुद्रमार्गे आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ लागला. खोल नैसर्गिक बंदरांमुळे भडोच, सोपारा, कल्याण आणि चौल ही बंदरे उदयास आली. पैकी चौलच्या भौगोलिक परिस्थितीकडे पहायाचे झाल्यास पश्चिम किनारपट्टी वरील एकाही बंदराने चौल बंदराइतकी दीर्घकालीन संपन्नता उपभोगली नाही.
सातवाहन काळातील सातवाहन व क्षत्रप यांच्यातील युद्ध काळात सोपारा, कल्याण, भडोच सारखी बंदरे ही व्यापारासाठी असुरक्षित झाली म्हणूनच चौलच्या बंदराचे महत्त्व वाढू लागले. चौलच्या बंदरातून व्यापार वाढू लागला आणि चौल हे सातवाहन काळात निर्यातीचे एक प्रमुख केंद्र बनले.
सातवाहनकाळास समांतर असणाऱ्या अनेक परदेशी प्रवाशांच्या, व्यापाऱ्यांच्या वर्णनात चौल बंदरातील व्यापाराचे उल्लेख येतात त्यामध्ये स्ट्रॅबो, प्लिनी, टॅसिटस, टॉलेमी आणि 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रीयन सी' या ग्रंथाच्या कर्त्याने दिलेली माहिती अधिक विश्वासनीय आहे.
रोमन, ग्रीक, अरबी आणि युरोपियन प्रवाशांच्या नजरेतून पाहिलेलं हे आंतरराष्ट्रीय बंदर, सह्याद्रीतील प्राचीन घाटमार्ग आणि अष्टागारातील समृद्ध धार्मिक परंपरा यांचा मागोवा घेणारा हा ग्रंथ इतिहास संशोधक, पर्यटक आणि वाचकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे.
top of page
₹450.00 Regular Price
₹400.00Sale Price
The book will ship after 15th October 2026
bottom of page


