मला साहित्यवाचन, कविता यांची आवड शालेय जीवनापासून होती. संसार करता करता वयाच्या साठीनंतर मी छंद म्हणून कविता रचायला लागले. आता कविता माझी सखी झाली. तिच्यावाचून मला करमत नाही. आता माझे पहिलं कवितेचे पुस्तक “सुमती सुमने” वाचकांना देताना मला समाधान वाटते.
मायमराठी किती थोर
तिचे कसे फेडू उपकार?
मायमराठीला अवीट गोडी,
वाटले सेवा करावी थोडी.
हे भाग्य मज जीवनी,
मोद भरतो मनो मनी.
पीच ब्लिंक प्रकाशन ज्यांनी या पुस्तकाला प्रकाशित केले त्यांना माझे मनापासून खूप खूप धन्यवाद!
Sumati Sumane
₹249.00Price