top of page

NAVIN MHATRE / नवीन म्हात्रे

Nov 3
2 min read

भारताचा इतिहास हा केवळ राजे-महाराजे, युद्धे आणि साम्राज्यांच्या विस्तारापुरता मर्यादित नाही, तर तोव्यापार, संस्कृती, सामाजिक जीवन आणि समृद्ध परंपरांचा एक विशाल दस्तऐवज आहे. या इतिहासाचाअभ्यास करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे एक अभ्यासक आणि लेखक म्हणूनत्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय म्हणजे प्राचीन भारताचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहास, भारतीय संस्कृती, प्राचीन महाराष्ट्र आणि कोकणाचा इतिहास, भारतातील वारसास्थळे तसेच राज्यशास्त्र. इतिहासाकडे केवळ भूतकाळ म्हणून न पाहता, त्यातून वर्तमानाला समजून घेण्याची आणि भविष्याला दिशादेण्याची संधी म्हणून पाहणे ही त्यांच्या अभ्यासाची विशेष दृष्टी आहे.


इतिहासाविषयीची त्यांची आवड केवळ लेखन आणि वाचनापुरती मर्यादित नाही. नाणी, शस्त्रे, हस्तलिखिते, दगडी हत्यारे आणि विविध पुरातन वस्तूंचा संग्रह करणे तसेच त्यांची प्रदर्शने आयोजित करणे हा त्यांच्याकार्याचा महत्त्वाचा भाग आहे. या माध्यमातून प्राचीन इतिहासातील वस्तूंचे महत्त्व आणि त्यामागील ऐतिहासिकसंदर्भ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.


तरुणाईमध्ये भारतीय इतिहासाविषयी उत्सुकता आणि अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने त्यांनी 'आरंभहेरिटेज' या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत मुंबई आणि महाराष्ट्रातील विविधऐतिहासिक वारसास्थळांना नियमित भेटी आयोजित केल्या जातात. या भेटींमध्ये सहभागी सदस्यांना संबंधितस्थळांचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांची सविस्तर माहिती दिली जाते. इतिहासहा केवळ पुस्तकांमध्ये वाचण्याचा विषय नसून प्रत्यक्ष अनुभवण्याचा आणि समजून घेण्याचा विषय आहे, हादृष्टिकोन रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांनी इतिहासविषयक लेखन केले आहे. तसेचमहाराष्ट्रातील अनेक मान्यवर संस्थांच्या उपक्रमांमध्ये इतिहासातील विविध विषयांवर व्याख्याने देऊन त्यांनीआपल्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा परिचय करून दिला आहे. सत्याधिष्ठित, परखड आणि भारताचाविजयी व विजिगीषु इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.


चौलच्या बंदराचा समृद्ध इतिहास : एका ऐतिहासिक प्रवासाचामागोवा

त्यांच्या ऐतिहासिक अभ्यासाची प्रचिती त्यांच्या चौलच्या बंदरावरील ग्रंथातून येते. भारताच्या पश्चिमकिनारपट्टीला लाभलेल्या नैसर्गिक बंदरांमुळे प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापाराला मोठी चालनामिळाली. भडोच, सोपारा, कल्याण आणि चौल यांसारख्या बंदरांनी या व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, या सर्वांमध्ये चौलच्या बंदराने दीर्घकाळ टिकवून ठेवलेले व्यापारी आणि सांस्कृतिक महत्त्व विशेषउल्लेखनीय आहे.


सातवाहनकाळात सातवाहन आणि क्षत्रप यांच्यातील संघर्षांमुळे सोपारा, कल्याण आणि भडोच यांसारख्याबंदरांच्या व्यापारावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर चौल बंदराचे महत्त्व वाढत गेले. येथून होणाऱ्याव्यापाराला चालना मिळाली आणि चौल हे सातवाहन काळातील निर्यातीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक बनले.


चौलच्या व्यापारी वैभवाचे संदर्भ केवळ भारतीय ऐतिहासिक साधनांमध्येच नव्हे, तर परदेशी प्रवासी आणिव्यापाऱ्यांच्या लिखाणातही आढळतात. स्ट्रॅबो, प्लिनी, टॅसिटस, टॉलेमी तसेच 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रीयन सी' याप्राचीन ग्रंथातील उल्लेख चौलच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांचा


(English)


An avid history researcher, writer and heritage enthusiast, the author specialises in the political, economic and social history of ancient India, Indian culture, ancient Maharashtra and Konkan, and Indian heritage sites.



With a keen interest in preserving historical heritage, the author collects and exhibits ancient coins, weapons, manuscripts, stone tools and other antiquities. Through his initiative, 'आरंभहेरिटेज' (Aarambh Heritage), he regularly organises heritage visits across Mumbai and Maharashtra, introducing young people to the region's rich historical and cultural legacy.


His historical articles have been published in various newspapers, weekly publications and Diwali special editions. He has also delivered lectures on historical subjects at several reputed institutions across Maharashtra.


His literary contributions include books on the tribal communities of Palghar and the historical significance of Maharashtra's ancient port towns. His work on the historic port of Chaul explores its maritime trade, political history, ancient trade routes and rich cultural traditions.


Driven by the belief that history should be based on truth and presented with conviction, his mission is to bring India's rich and glorious past closer to the younger generation.



 

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page